40 हजार रुपयाचा सागाचा मुद्देमाल केला जप्त

0

नवापूर वनविभागाची कारवाई
नवापूर :
तालुक्यात नवापूर व चिंचपाडा शासकीय वाहनाने नवापूरचे वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांच्यासह रेजस्टाँफ, नवापूर येथील पोलीस कर्मचार्‍यांनी मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन बारी येथे अज्ञातस्थळी घराच्या पडसाळीत साग लाकडापासून बनविलेले फर्निचर आढळून आले. तसेच सागसाईज नग 37 व साग लाकडाचे तयार पलंग, सोपा खुर्चीसह 40 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन शासकीय वाहनाने नवापूर येथील शासकीय काष्ठ आगार येथे जमा करण्यात आला. वनपाल वडकळंबी यांनी गुन्हाची नोंद केली. ही कारवाई उपवनसंरक्षक नंदुरबार वनविभाग शहादा, उपवनसंरक्षक दक्षता पथक धुळे, सहायक वनसंरक्षक नंदुरबार वनविभाग यांचा मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास सुरु असल्याचे वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.