मनोर । पॉवर ग्रीड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या वतीने वापी-नवी मुंबई ते नवसारी-बोईसर मार्गावर 400 केव्ही या अतिउच्च दाब वाहिनीच्या निर्मितीचे काम सुरु आहे. या कामात खड्डे खोदून काँक्रिटीकरण करून त्यावर मनोरे (टॉवर) उभारून विद्युत तारा खेचन्याचे वाडा तालुक्यातील खरीवली ह्या गावाच्या हद्दीत सुरु होते. मात्र विद्युत् तारा खेचताना त्यातील एक मनोरा (टॉवर) निकृष्ठ कामामुळे अचानक कोसळला ह्या मनोर्यावर चढून विद्युत तारा खेचणारे जमील शेख, कल्लीवादीन शेख, नाकीर शेख, सानुवाल शेख हे चार कामगार पडल्याने त्यांना जबर दुखापत झाली आहे.
त्यांच्यावर वाडा येथील गुरुकृपा हॉस्पिटलमधे उपचार करण्यात येत आहे. मात्र या घटनेबाबत पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयात कोणत्याही प्रकारची तक्रार केलेली नाही त्यामुळे कंपनीने आणि ठेकेदाराने लपऊन ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.
दोन महिन्यापूर्वीच वाडा तालुक्यातीलच भावेघर येथील ह्याच कंपनीचा एक टॉवर कोसळला होता. त्या वेळेस तेथे काम करणार्या पती-पत्नी शेतावर काम करत असताना शेताच्या बाजुलगत असलेला मनोरा (टॉवर) अचानक कोसळला आणि तेबालंबाल बचावले. सुदैवाने मात्र कोणतीही जिवित हानी झाली नव्हती. मात्र ह्या वेळेस चार जण जखमी झले आहेत.