विज्ञानातूनच विद्यार्थ्यांचा खरा विकास घडणे शक्य

0

खिर्डी। विज्ञान आणि मानव यांचा फार वर्षांपुर्वीपासून घनिष्ट संबध आहे विज्ञानातुन विद्यार्थांचा खरा विकास होतो असे प्रतिपादन दि रुरल एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष डिगंबर पाटील यांनी केले. ते अपूर्व विज्ञान मेळाव्याच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी बोलत होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष टी.एल. पाटील, चेअरमन विजय पाटील उपस्थीत होते.

50 उपकरणे बनवली
यावेळी इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी 50 उपकरणे बनवली. कार्बन डायऑक्साईड निर्मिती, बायोगॅस निर्मिती, अपघात निवारण गतीरोधक, वॉटर हीटर, वॉटर फिल्टर यांसह 50 उपकरणे मेळाव्यात ठेवली होती.

यांनी केले मार्गदर्शन
या उपकरणांची माहीती जाणून घेतली या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक आर.बी. पाटील, ए.एस. चव्हाण, ए.पी. तडवी, एस.झेड. महाजन यांचे मार्गदर्शन मिळाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एस.ए. पाटील, प्रयोग शाळा सहाय्यक संदीप पाटील व सर्व शिक्षक उपस्थित होते.

पुरस्काराने सन्मानित करणार
शाळेतर्फे विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टीकोनाला चालना मिळण्यासाठी दरवर्षी अशाप्रकारचे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असते. यंदाही राबविण्यात आलेल्या या उपक्रमास शाळेच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येते. यातील उत्कृष्ट प्रदर्शन साकारणार्‍या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येईल.