सेनेचा सरकार विरोधात ‘ढोल बजाओ’

0

धुळे । सरकारने दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. या कर्जमाफीचा मात्र 40 लाख शेतकर्‍यांना होईल, असे सरकार सांगत आहे. परंतु, त्यात अनेक त्रुटी आहेत. या तुटींची पूर्तता करुन सरकारने सरसकट कर्ज माफी करावी, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबाहेर ‘ढोल बजाओ’ आंदोलन करुन सरकारचे लक्ष वेधले आहे. आंदोलन शिवसेनेचे उपनेते अनंत तरे, संपर्क प्रमुख बबन थोरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. सरकारच्या कर्ज माफी निर्णयात त्रुटी असल्याने बरेचशे शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचीत राहणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील 73 हजार शेतकर्‍यांपैकी नेमका किती शेतकर्‍यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. याची यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी जिल्ह बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली. शिवसेनेने राज्यात केलेल्या आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढला. त्यामुळे त्यांनी दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. परंतु अर्धवट कर्जमाफी देऊन सरकारने शेतकर्‍यांची दिशाभूल केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

आंदोलनात हे होते सहभागी
शिवसैनिकांचा शवसेनेच्या ‘ढोल बजाओ’ आंदोलनात जिल्हाप्रमुख हिलाल माळी, डॉ. माधुरी बोरसे, भगवान करनकाळ, महेश मिस्तरी, सतीश महाले, कैलास पाटील, संजय गुजराथी, गंगाधर माळी, अतुल सोनवणे, भूपेंद्र लहामगे, कैलास मराठे, राजेंद्र पाटील, मनिष जोशी, शानाभाऊ सोनवणे, संदीप सूर्यवंशी, सुनिल बैसाणे, पंकज गोरे, देविदास लोणारी, सुबोध पाटील, संदीप चव्हाण, बबन चौधरी, रामदास कानकाटे, देवराम माळी यांच्यासह असंख्य शिवसैनिक सहभागी झाले.

निकष बदलवून जनतेत संभ्रम
राज्यभरात सेनेचे ढोल बजाओ राज्यभरात सेनेचे ढोल बजाओ राज्यभरात सेनेचे ढोल बजाओ राज्यभरात 40 लाख शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असतांना शासन दररोज वेगवेगळे निकष लावून आणि वेगवेगळी आकडेवारी जाहीर करुन संभ्रम निर्माण करीत आहे. वास्तविक राज्य सरकारला शेतकर्‍यांना कर्ज माफी द्यायचीच नसून फक्त वेळ मारुन नेण्यासाठी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. शेतकर्‍यांना कर्जमाफी द्यायचीच असेल तर लाभार्थ्यांची निश्‍चित आकडेवारी शासनाने जाहीर करावी, या मागणीसाठी शिवसेनेने आज जिल्हाभरातील शेतकर्‍यांची बँक म्हणूनसंबोधल्या जाणार्‍या मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकांसमोर ढोल बजाओ आंदोलन करुन निवेदन दिले आहे.

शिरपूर येथील आंदोलन
शिरपूर तालुका शिवसेनेतर्फे येथील महाराजा कॉम्प्लेक्समधील जिल्हा बँकेसमोर सेनेने ढोल वाजवून आंदोलन केले. राज्य सरकारने दीड लाखापर्यंत शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. या कर्जमाफीचा 40 लाख शेतकर्‍यांना लाभ होणार असल्याचे सरकार सांगत आहे. त्यामुळे या तालुक्यातील किती शेतकरी कर्जबाजारी आहेत व त्यापैकी आजपावेतो किती शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे याची सविस्तर यादी मिळावी यासाठी सेनेतर्फे ढोल वाजवून आंदोलन करण्यात आले. यावेळी सेनेचे उपजिल्हाधिकारीप्रमुख हिंमत महाजन, तालुकाप्रमुख भरतसिंग राजपूत, माजी उपलजिल्हाप्रमुख राजू टेलर, छोटूसिंग राजपूत, विभाभाई जोगराणा, राजेश गुजर, किरण पाटील, मनोज धनगर, दीपक मराठे, बंटी लांडगे, योगेश ठाकरे, प्रदीप पाटील, अभय भदाणे, मसुद शेख, निलेश वाल्हे, बदुलाल बंजारा आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. यानंतर जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी व्ही.झेड.चौधरी यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले, या संदर्भातील माहिती जिल्हा बँकेच्या धुळे येथील मुख्य शाखेकडूनच उपलब्ध होवू शकेल त्यामुळे येथून माहिती मिळू शकत नाही. तरी वरिष्ठांना सांगून अधिकची माहिती घेण्याची विनंती त्यांनी केली. यावेळी पो.नि.संजय सानप, पीएसआय मुकेश गुजर यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला.

शासनाची टोलवा-टोलवी
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी धीरज चौधरी यांच्याकडे कर्जमाफीचा लाभ मिळणार्‍या शेतकर्‍यांची यादी मागितली. धीरज चौधरी म्हणाले की, कर्जमाफीतील पात्र शेतकर्‍यांची यादी तयार करण्याचे काम स्थानिक पातळीवर विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव करीत आहेत. हे काम पुर्ण जिल्हाभर सुरु असून नंदुरबार धुळे जिल्ह्यात विविध कार्यकारी सोसायटी मार्फत तयार केलेल्या यादींचे शासनस्तरावर ’ऑडीट’ केले जाईल. त्यात निकषपात्र जे शेतकरी असतील. त्यांची यादी जिल्हा बँकेतर्फे जाहीर केली जाईल. शासनाचा हा प्रकार केवळ टोलवा टोलवीचा असल्याने त्यातून दिरंगाई करण्याचे धोरण शासन अवलंबित आहे,असा आरोप शिवसेनेतर्फे यावेळी करण्यात आला.