पाचोरा । गोराडखेडा – वेरुळी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले असुन सदरचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी. याबाबत वेरुळीच्या सरपंचासह ग्रामस्थांनी निवेदने देवुन चौकशीची मागणी केली आहे. तालुक्यातील गोराडखेडा – वेरुळी खु या रस्त्याचे 900 मिटर डांबरीकरणाचे काम गेल्या वर्षाच्या आर्थिक वर्षात करण्यात आलेले आहे. हे काम स्थानिक विकास निधी अंतर्गत झाल्याचे समजते. सदरचे काम पहाता डांबरीकरण झालेल्या रस्त्याचे दुतर्फी साईडपट्टयांवर आवश्यक असलेला पुरेसा मुरुम न टाकताच काम केल्याचे चित्र आहे. तसेच रस्त्याचे कामास अद्याप चार महिनेही पुर्ण होत नाही. तो पर्यंत डांबरीकरण रस्ता ठिकठिकाणी दबुन दुभंगत आहे. संबंधित कामाची सखोल चौकशी होणेबाबत वेरुळीच्या सरपंच मनिषा शरद पाटील यांचेसह ग्रामस्थांनी जलसंपदा मंत्री ना. गिरिष महाजन, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी पाचोरा व तहसिलदार पाचोरा यांना निवदने दिली आहेत.