रोहित शर्माच्या हेअरकटची चाहत्यांकडून सोशल मीडियात खिल्ली

0

मुंबई । याआधी आयपीएल स्पर्धेदरम्यान रवींद्र जाडेजाने ’ब्रेक दबीयर्ड’ हा नवीन ट्रेंड सुरू केला होता. जडेजाने आपला लूक चेंज केल्यानंतर हार्दिक पांड्याने त्याला फॉलो केले होते. सध्या वेस्ट इंडिजच्या दौर्‍यावर असलेल्या भारतीय संघात रोहित शर्माला स्थान देण्यात आलेले नव्हते. संघ प्रशासनाकडून त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता

हेअरस्टाईलचे छायाचित्र ट्विट
मायदेशात असलेला रोहित शर्माने या सुट्टीचा पुरेपूर फायदा उठवला. यावेळी रोहित शर्माने आपल्या हेअर कटवर एक हटके प्रयोग करून पाहिला. मात्र, त्याचा हा प्रयोग पुरता फसल्याचे दिसत आहे. रोहितने सोमवारी ट्विटवर आपल्या नवीन हेअरस्टाईलचे छायाचित्र ट्विट केले. मात्र, चाहत्यांना रोहित शर्माचा नवीन हेअरकट फारसा रूचला नसल्याचे दिसून आले.

‘ब्रेक द बीयर्ड’ हा नवीन ट्रेंड
सोशल मीडियावर अनेक युजर्सनी रोहित शर्माची खिल्ली उडविली. या हेअरकटमुळे आता गोलंदाजही तुला ओळखू शकणार नाहीत, फॅशन म्हणून काहीही केले जाते, अशा छापाच्या अनेक प्रतिक्रिया चाहत्यांकडून व्यक्त करण्यात आल्या. यापूर्वी आयपीएल स्पर्धेदरम्यान रवींद्र जाडेजाने ‘ब्रेक द बीयर्ड’ हा नवीन ट्रेंड सुरू केला होता.