आज देशातील बेरोजगारांना स्किल एज्यूकेशन शिक्षणावर भर देण्याची गरज

0

-विवेक जागर कार्यक्रमात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण; प्रगतच्या माध्यमातून शेतीही करणे गरजेचे

-जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन यांचे प्रतिपादन

जामनेर । देशात आज बेरोजगार तरुणांच्या पिढ्या बरबाद होत आहे. इंजिनिअर झालेल्या तरुणाला पाच हजार रुपये महिन्याची नोकरी देऊ शकत नाही. माझे जलसंपदा खातेत 1300 जागेसाठी 48 हजार अर्ज आले. पदवी मिळवून असंतोष आहे, म्हणून आज देशाला स्किल एज्युकेशनची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीनी सर्वात आधी स्किल एज्युकेशन शिक्षणावर भर दिला. त्यामुळे तरुणांच्या हाताला तात्काळ काम मिळून रोजगार उपलब्ध होईल, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री ना. गिरीश महाजन यांनी केले. जामनेर येथील पंडित दिन दयाळ प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेच्या इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅन्ड रिसर्च व ज्ञानगंगा उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या विवेक जागर जिल्हास्तरीय स्पर्धा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ना. महाजन बोलत होते.

मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
यावेळी व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. गोखले, संस्थेचे सचिव कडू माळी, ईएमआर कॉलेजचे सचिव दिपक पाटील, संस्थेचे संचालक अ‍ॅड. शिवाजी सोनार, अरविंद चौधरी, प्राचार्य किशोर पाटील, प्रा.आर.जे. सोनवणे, डॉ. प्रशांत भोंडे, मुख्याध्यापक देविकास काळे, अमर पाटील, जितू पाटील उपस्थित होते. ना. महाजन पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानात न अडकता प्रॅक्टीकलला महत्त्व देण्याची गरज आहे. कुठलेही काम करतांना न्युनगड बाळगू नका. प्रगत विज्ञानाच्या माध्यमातून प्रगतशील शेती करता येते. परंतु आजच्या उच्च शिक्षीत तरुणाला शेतात काम करण्याची लाज वाटते. मनाशी खुनबूट बांधली तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही, असे सांगून ना. महाजन म्हणाले की, महापरुषांच्या जयंत्या आपण साजर्‍या करतो. परंतु त्यांचे आचार विचार आचरण्यात आणले का? रोजच्या व्यवहारात त्यांचे गुण अंगीकारक करा, असे आवाहन ही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

विजेत्यांना दिले बक्षिस
प्रमुक वक्ते देवदत्त गौखले जळगाव मार्गदर्शन करतांना म्हणाले की, पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरात चांगला शिक्षण मिळत हा भ्रम काढून टाका, कौशल्याच्या बळावर तुमचा विकास अवलंबून आहे. जीवनात यशस्वी व्हायच असेल तर प्रात्याक्षिकावर भर द्या असे ही ते म्हणाले. आपल्या समारोपाच्या भाषणात तहसिलदार परमेश्‍वर कासूडे यांनी स्वामी विवेकानंदाच्या जीवनातील महत्त्वपूर्ण पैलूवर प्रकाश झोत टाकला. पोउनि विशाल पाटील यावेळी उपस्थित होते. विवेक जागरच्या क्विज कॉन्टेस्टचे प्रथम बक्षीस धारीवाल कॉलेज, द्वितीय बक्षीस शेंदुर्णी महाविद्यालय तर तृतीय बक्षीस ज्ञानगंगा महाविद्यालय जामनेरने पटकाविले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली वाणी तर आभार रविंद्र झाल्टे यांनी मानले. आपल्या प्रास्ताविक भाषणात प्राचार्य किशोर पाटील यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमाविषयी माहिती दिली.