महिला महाविद्यालयात परिसर मुलाखतीत 15 विद्यार्थीनींची निवड

0

भुसावळ । श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात जेबीएफआयतर्फे कॅम्पस मुलाखती घेण्यात आल्या. यासाठी आयबीएफआयचे एच.आर. मीर व हरिश भोपाळ येथून आले होते.

यामध्ये महाविद्यालयातील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थीनींनी मुलाखती दिल्या असता यात 15 विद्यार्थींनीची निवड करण्यात आली आहे. अधिकार्‍यांचे स्वागत करियर कौसलिंग व प्लेसमेंट सेलचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. जे.व्ही. धनवीज यांनी केले. उपप्राचार्य प्रा. व्ही.एस.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मुलाखती संदर्भात मार्गदर्शन केले व त्यांना मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या यात तृतीय वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान तसेच एम.ए, एम.कॉम, एम.एससीच्या 102 मुली सामोरे गेल्या. निवड झालेल्या विद्यार्थीनींना आयसीआयसीआय बँकेत रुजू करण्यात येणार असून त्यांना वार्षिक 2.33 लाख पगार देण्यात येणार आहे. याप्रसंगी उपप्राचार्य धनवीज यांनी मार्गदर्शनात सांगितले की, जीवनात यशस्वी होण्यासाठी अपयशाला घाबरुन न जाता पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. याद्वारे 15 विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. यशस्वीतेसाठी करिअर उपप्राचार्य जे.व्ही. धनवीज, समिती सदस्य प्रा.के.सी. सुर्यवंशी, प्रा. निलेश गुरुचजळ यांनी परिश्रम घेतले.