जळगाव । महानगरपालिकेला अमृत योजनेतून पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. यासाठी गेल्या महीन्यात पहिल्या टप्प्यांच्या कामासाठी 191 कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. यातील एका मक्तेदाराने दुसर्या मक्तेदरावर आक्षेप घेतल्याने प्रकीया खोळंबली आहे. याप्रकरणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मागविलेली माहीती संबधित तिनही मक्तेदरांकडून घेवून ती महापालिकेने बुधवारी पाठविली आहे. यामुळे हा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पहिल्या टप्प्यातील 191 कोटींची निविदा
महापालिकेचा अमृत योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यातून पाणीपुरवठा योजनेस मंजूरी मिळाली आहे. यात जलवाहीन्यांची नविन वितरण व्यवस्था करण्यात येणार आहे. सनाला सादर केलेल्या पाणीपुरवठा याजेनेचा 400 कोटी रुपयांचा प्रस्ताव स्विकारून जळगाव महापालिकेचा अमृत योजनेत समावेश केला. त्या अनुशंगाने पहील्या टप्प्यातील 191 कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदा प्रकीया राबविण्यात आली. यात तीन मक्तेदारांकडून निविदा प्राप्त झाल्या होत्या. यातील एका मक्तेदाराने दुसर्या मक्तेदारावर आक्षेप घेतल्याने निविदा अद्याप उघडण्यात आल्या नाहीत. याचा निर्णयासाठी हा विषय
शासनाकडे गेला होता.
जीवन प्राधिकरणाकडे घेणार निर्णय
या प्रकरणी योजनेचे तांत्रिक सल्लागार असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने निविदा भरणार्या तीनही मक्तेदारांकडून काही माहीती मागविली होती. त्यानुसार ही माहीती महापालिका प्रशासनाला प्राप्त झाली आहे. त्याची पडताळणी करुन बुधवारी ही माहीती पाठविण्यात आली. यावर प्राधिकरण निर्णय घेवून निविदा घउडणार असल्याने लवकरच जळगावच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामास सुरुवात होणार आहे.