डॉ.सुरेश ओस्तवाल यांची तालुकाध्यक्षपदी निवड

0

शेंदुर्णी । जामनेर येथे तालुका होमिओपँथीक डॉक्टर्स संघटनेची सभा डॉ.राजेंद्र ललवाणी यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात शेंदुर्णी येथील डॉ.सुरेश ओस्तवाल यांची संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तालुक्यातील होमिओपँथीक डॉक्टर्स तसेच प्रकाश झंवर, डॉ.अल्केश नवाल, डॉ.निलम अग्रवाल, डॉ.अतुल पाटील, डॉ.देवानंद कुळकर्णी, उत्तमराव थोरात, राजमल अग्रवाल, सुरेश बारी, रमेश पाटील, यशवंत पाटील, सुभाष चौधरी आदींनी अभिनंदन केले.