42 कबुतरांच्या जोड्यांसह मोटार लंपास

0

जळगाव । चोरीत अडथळा होवू नये म्हणून वॉचमनच्या संपूर्ण कुटूंबियांवर गुगींची पावटर फेकून त्यांना बेशुध्द केले. आणि अशक्य वाटणारे तीन कुलूप तोडून कबुतरांच्या सुमारे 42 जोड्यांसह दोन विजेच्या मोटरी चोरुन नेल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला आहे. ही घटना एमआयडीसी परिसरातील के सेक्टरमध्ये आज सकाळी उघडकिस आली.

गणेशवाडीतील परिश्रम बिल्डींग येथे गवेंत किशोर राणे (वय 27) राहतात. त्यांची एमआयडीसी परिसरात के सेक्टरमध्ये प्लॉट नं.62 येथे ऍग्री स्रोब म्हणून कंपनी आहे. केमिकलची पावडर याठिकाणी निर्मीती करण्यात येते. गवेंत राणे यांच्या कंपनीमध्ये 40 ते 42 कबुतरांची जोडी होती. व्यवसायानिमीत्त संपूर्ण भारतभर भ्रमंती करीत असतांना मुंबई, दिल्ली, आग्रा, केरळ अश्या विविध ठिकाणांहुन कबुतरांच्या जोड्या राणे यांनी आणल्या. या कबुतरांसाठी लिडोन या कंपनीमध्ये एका खोलीत कबुतरांचे बॉक्स त्यांनी तयार केले होते. यासाठी तुकाराम वाडीतील एका वेल्डेरकडून राणे यांनी कबुतरांच्या संरक्षणासाठी रुमची व्यवस्था केली होती.

पवार म्हणून राणे यांच्या कंपनी सुरक्षा रक्षक आहेत. ते त्यांची तीन महिन्याची मुलगी, पत्नीसोबत कंपनीत राहतात. कबुतरांच्या खोली पर्यंत पोहचण्यासाठी तीन कुलूप तोडावे लागणार असल्याची कल्पना चोरट्यांना असावी. यासाठीच त्यांनी पवार कुटूंबियांवर झोपेचे काहीतरी गुंगीचे औषध फेकले. यामूळे दररोज पहाटे चार वाजता उठणारे पवार सकाळी 7 वाजता उठले.राणे यांच्या कंपनीतून सुमारे 80 हजार रुपये किंमतीचे कबुतरांच्या जोड्या आणि 5 एचपी व 15 एचपीच्या सुमारे 25 हजार किंमतीच्या दोन विजेच्या मोटरी लंपास झाली आहे.