शहादा: सध्या देशभरात लॉकडाऊन आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या जनधन खात्यात 500 टाकले आहेत. ते काढण्यासाठी आता बँकेसमोर मोठी गर्दी होत आहे. शहादा येथे रखरखत्या उन्हात जनधन खात्यातील 500 रुपये काढण्यासाठी खातेदारांनी गर्दी केली आहे. जिल्ह्याभरात ४२ ते ४३ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाच्यावतीने जनधन खात्यात पैसे टाकण्यात आले आहे. बँक सुरु होण्याआधीच बँकेच्या बाहेर मोठमोठ्या रांगा लागल्याचे चित्र आहे. दिवसभर बँकेचे खाते धारक पैसे काढण्यासाठी उन्हात उभे असताना देखील संबंधित बँकांनी खातेदारांसाठी कोणती व्यवस्था न केल्याने खातेधारकांना दिवसभर उन्हात उभे राहून आपले पैसे काढावे लागत आहेत.
शहरासह तालुक्यातील खातेधारक पैसे काढण्यासाठी येत असल्याने त्यांचे उन्हामुळे प्रचंड हाल होत आहेत. म्हणून संबंधित बँक प्रशासनाने या नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करण्याची मागणी होत आहे.