४२ दिवस याठिकाणी जाणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द

0

मुंबई-वाराणसी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ जवळ बांधकाम सुरू असल्याने भारतीय रेल्वेकडून ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. १५ जून ते २६ जुलै या ४२ दिवसांच्या कालावधीत हा ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे वाराणसीहून जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका बसला आहे. मुंबई, बिहार, मध्य प्रदेश , पश्चिम बंगाल, छत्तीसगड इत्यादी ठिकाणी जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम होणार आहे. दरम्यान, ज्या प्रवाशांनी तिकीट आरक्षित केले असेल त्यांनी तिकीट रद्द केल्यास त्यांना पूर्ण परतावा मिळणार आहे.