बारामती : डोर्लेवाडी येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत चक्कर येऊन कोसळल्याने ओंकार सुनील देवकाते (वय 13, रा. सोनगाव) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शुक्रवारी (दि. 14) दुपारी शाळेमध्ये हा प्रकार घडला. ओंकार सातवीत शिकत होता. त्याला विद्यार्थ्याला अचानक चक्कर आली. त्यामुळे येथील शिक्षकांनी त्याला तातडीने बारामतीला उपचारासाठी हलविले. परंतु, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. फेब्रुवारी महिन्यात याच शाळेत कोमल मासाळ या विद्यार्थिनीचा बसखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती.