रावेर । तालुक्यातील रसलपुर येथील व्ही.एस.नाईक विद्यालयात अपुर्व विज्ञान मेळावा नुकताच संपन्न झाला. इयत्ता 6 वी ते 10 वी च्या वर्गातली सुमारे 75 विद्यार्थ्यांनी या विज्ञान मेळाव्यात सहभागी होऊन आपल्या विविध उपकरणांची मांडणी केली. त्यात पारंपरिक व आधुनिक शेती, सोलर वॉटर हिटर, सोलर कुकर, खार्या पाण्यापासून विजनिर्मिति, टाकाऊ पासुन टिकाऊ वस्तू एटीएम मशीन परिदर्शी, हवेच्या दाबावर चालणारे जेसिबी, पाऊस मोजणी यंत्र आदी उपकरणे सादर केली.
प्रदर्शनाची पाहणी
विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन मुख्याध्यापक सी.सी. शहाणे यांच्या हस्ते झाले. नाईक महाविद्यालयाचे प्राध्यापक अविनाश सोनार यांच्यासह मान्यवरांनी भेटी दिल्या. विद्यालयाचे विज्ञान शिक्षक गणेश चौधरी व संगिता चौधरी यांनी सदर मेळाव्याच्या आयोजना साठी परिश्रम घेतले तर जी.एन. पाटील, एस.बी. गोंटे, पी.जी. भालेराव, पी.व्ही. महाले, डी.बी. पाटील, ए.पी. महाले व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.