संपुर्ण शेतकरी कर्जमाफी होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही

0

धुळे । किती दिवस गप्प बसायचे. शेतकर्‍यांचा खरीप हंगाम वाया जात आहे. बॅकाना योग्य निर्देश दिले नाहीत त्यामुळे बॅकाही संभ्रमावस्थेत आहेत. शेतकरी संभ्रमित झाले आहेत. आहेत जोपर्यंत सर्व शेतकर्‍यांना कर्जमाफी लाभ मिळणार नाही. तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही. घोषणा करतात,त्या सत्यात उतरत नाहीत. छत्रपती राजर्षी शाहू महाराज नाट्य मंदिरात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे बोलत होते.

अजित पवार सभास्थळी 4 वाजेला पोहचले, कार्यकर्ते बसले ताटकळत
सभेची वेळ 2 वाजेची ठरलेली होती. मात्र अजित पवार हे सभा स्थळी 4 वाजेला पोहचले. त्यामुळे सभा दोन तास उशिरा सुरू झाल्याने कार्यकर्त्यांना ताटकळत बसावे लागले. यावेळी पवारांनी भाजपा सह शिवसेनेवर ही टीका केली. बँकेसमोर ढोल काय वाजवता इतकीच ढोल वाजवायची हौस असेल तर मुख्यमंत्रांसमोर वाजून दाखवा तेव्हा मी म्हणेन की तुम्ही खरे शिवसैनिक आहेत. सत्तेचा लोभ सुटत नाही आणि म्हणे आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरतो. अरे पावसाळा सुरू आहे ते राजीनामे खिशातून काढा नाहीतर ओले होतील. दुटप्पी भूमिका करून जनतेला मूर्ख बनवू नका. असे सांगत उद्धव ठाकरेंना निशाण केला.

सर्व खेळखंडोबा चाललाय..
सर्व खेळखंडोबा चालला आहे. शिवसेनेचे नेते बँकेच्या बाहेर ढोल बडवितात ढोल बढवून काय हआहे ? शेतकरी आडला आहे. त्यातून त्यांना बाहेर काढायचे आहे. शेती मालाला भाव नाही शेतकर्‍यांना जगण्यासाठी ताकद दिली पाहिजे. कार्यकर्त्यांनो गेली 15 वर्ष सत्तेत आपण होतो विरोध करणे माहीत नव्हते त्यामुळे गेल्या काही वर्षात मरगळ अली आहे ती झटकून उठा आणि पक्ष मजबूत करा.

यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माहिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, प्रमोद हिंदूराव,स्मिता पाटील,ईश्वर बाळ पूरे,मा.आ.रार्जवधन कदमबांडे, महापौर कल्पना महाले, ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदिप बेडसे ,शहर जिल्हा अध्यक्ष मनोज मोरे यशवर्धन कदमबांडे,किरण,विलास खोपडे ,कैलास चौधरी ,ज्योती पावरा, लीला बेडसे, आदी उपस्थित होते.