स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्वेक्षण

0

जळगाव । स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्वेक्षण करण्यासाठी केंद्रीय पथक जळगाव शहरात दाखल झाले. दरम्यान, पथकातील तीनही अधिकार्‍यांनी शहरातील ठिकठिकाणी भेट देवून स्वच्छतेबाबत माहिती घेतली. तसेच नागरिकांशी संवाद देखील साधला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशातील 500 शहरामध्ये जळगाव शहराचा समावेश आहे. या स्पर्धेचे 2 हजार गुण असून स्वच्छतेबाबत मनपाच्या माहिती व कार्यवाहीसाठी 900 गुण, नागरिकांशी संवाद 500 गुण आणि प्रत्यक्ष पाहणीचे 600 गुण असे एकूण 2 हजार गुणांचे सर्वेक्षण असणार आहे.

30 मुद्यांवर घेणार माहिती
क्युसीआयचे अधिकारी अंजनी यादव, रोहीत पाटील व भावेश प्रजापती यांची टीम शहरात दाखल झाली आहे. 22 जानेवारीपर्यंत 30 मुद्द्यांवर ते माहिती घेणार आहेत. अंजनी यादव यांनी महानगरपालिकेत स्वच्छतेबाबत कार्यवाहीच्या कागदपत्रांची तपासणी केली. भावेश प्रजापती यांनी सकाळी मटन मार्केटमध्ये जावून पाहणी केली. तर रोहीत शर्मा यांनी हरीविठ्ठल, खंडेराव नगर येथे जावून पाहणी केली. पथकातील तीनही अधिकारी 2 पर्यंत पाहणी करुन त्याचा अहवाल केंद्र शासनाकडे सादर करतील. त्यानंतरच गुणांकन ठरणार आहे.