आदेश बांदेकर यांच्या विरुध्द आचारसंहिता भंगची तक्रार

0

मुंबई । राज्यातील प्रसिध्द असलेला होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक , शिवसेनेचे उपनेते व भावजी म्हणून प्रसिध्द असलेले आदेश बांदेकर यांच्या विरोधात राष्ट्रीय बंजारा दलाच्या कार्यकर्त्यांनी आचारसंहिता भंग केल्याची तक्रार केली आहे. आदेश बांदेकर हे ‘होम मिनिस्टर ’ या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आचार संहिता सुरू असताना शिवसेनेचा प्रचार करत असल्याची तक्रार बंजारा दलाने मुख्य निवडणूक अधिकारी शेखर चन्ने यांच्याकडे केली आहे.

पोलीस वेल्फेअर मंडळाने काढले पत्रक
सध्या मुंबईतील पोलीस वसाहतीत ‘ होम मिनिस्टर ’ कार्यक्रमाचे चित्रिकरण सुरू आहे.‘ होम मिनिस्टर ’ कार्यक्रमात महिलांनी सहभागी व्हावे यासाठी पोलीस वेल्फेअर मंडळाच्या प्रमुखांनी पत्रक काढले आहे. अशा प्रकारे सरकारी यंत्रणांनी पत्रक काढणे ही आचारसंहितेचा भंग असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान आदेश बांदेकर हे एक कलाकार म्हणून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. शिवसैनिक म्हणून त्यांची भूमिका नाही असे निवडणूक आयोगाने बंजारा दलाच्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे. मात्र या कार्यक्रमात प्रचार होत असल्यास त्याची माहिती घेतली जाईल असे चन्ने यांनी म्हटले आहे. बांदेकर यांनी 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील माहीम मतदार पराभव झाला होता.