43 वर्षीय इसमाला शेती काम करताना सर्पदंश

43-year-old Isma was bitten by a snake while working in the field at Shiragad यावल : तालुक्यातील शिरागड शेत-शिवारात काम करत असतांना एका 43 वर्षीय इसमाला सर्पदंश झाला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले.

यावल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
शिरागड येथील युवराज माधव साळुंखे (43) हा इसम शेतात काम करत असतांना अचानक त्यांच्या उजव्या पायाला सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच त्याला सहकारी मजुर वर्ग व नातेवाईकांनी तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकिय अधिकारी डॉ.शिवराज चव्हाण, अधिपरीचारीका आरती कोल्हे, विजय शिंदेसह आदींनी उपचार सुरू केले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.