चाळीसगाव । चाळीसगाव रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफार्म नं. 2 वर एक वयस्कार महिला गेल्या चार ते पाच दिवसांपासून फिरत होती. कर्तव्यावर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे (आरपीएफ) उप निरीक्षक ए.के.सिंग, आरक्षक मारुती जाधव, आरक्षक जयकुमार हे स्टेशनवर गस्त घालत असताना त्यांना एक मनोरुग्ण महिला आढळून आली. ही महिला 45/47 वर्षाची आहे. हि महिला तिच्या चेहर्यावरून व अंगावरच्या कपड्यावरून सिंधी समाजाची आहे असे समजले. लगेच मारुती जाधव यांनी स्टेशनच्या बाजूला राहणार्या सिंधी समाजाच्या लोकांना बोलावून ह्या महिलेची ओळख आहे का? असे विचारले. असता त्या लोकांनी ह्या महिलेस ओळखतो असे सांगितले.
पाचोरा येथील कुटूंबीयांना फोनवरून माहीती
पाचोरा येथील सिंधी कॉलनीमध्ये राहते असे सांगितल्यानंतर लगेच त्यांनी त्या महिलेचे पती मनोहरलाल नानकराम मंधान याना फोन द्वारा कळविण्यात आले. सांगितले की तुमची पत्नी चाळीसगाव रेल्वे स्टेशन वर आहे आणि ती ठाण्या मध्ये आहे असे सांगितले त्यानंतर त्यांचा मुलगा व ते बायरोड चाळीसगाव येथे आले आणि त्यांनी आपली मतदानकार्ड दाखवून ओळख सांगितली. त्यानंतर त्या महिलेस स्टेशनमास्टर श्री. बडगुजर साहेबांच्या समक्ष सुपुर्तनामा लिहून त्यांचे पती व मुलगा यांच्या हवाली केले. त्या महिलेचे नाव मीराबाई मनोहरलाल मंधान आहे. त्यांच्या परिवाराने रेल्वे सुरक्षा बल चाळीसगाव यांचे आभार मानले.