जळगाव । दि जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेतर्फे बचत गटाच्या महिलांसाठी कॅशलेस बँकींगबाबत कार्यशाळा आयोजिज कर्ण्यात आली होती. दि जळगाव पीपल्स को-ऑप. बँकेशी 414 पेक्षा अधिक बचत गट संलग्नित आहेत. शुक्रवारी बँकेच्या दाणा बाजार शाखेत महिला बचत गट सदस्यांसाठी कॅशलेस बँकिंग जनजागृतीपर प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत बँकेचे आयटी विभागाचे महाव्यवस्थापक संतोष वाणी यांनी उपस्थित महिलांना कॅशलेस बँकिंग व्यवहारांतर्गत- बँकेचे मोबाईल बँकिंग अॅप कसे डाऊनलोड करावे, त्यातून व्यवहार कसे करावेत याबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली.
150 महिलांनी घेतले प्रशिक्षण
बँकेच्या डेबिट कार्ड व्दारे स्वाईप पेमेंट कसे करावेत आणि स्वत:च्या व्यवसायात पिओएस स्वाईप मशिन वापरुन पेमेंट कसे स्विकारु शकतात, याबद्दलही माहिती कार्यशाळेत देण्यात आली. बँकेच्या चिफ मॅनेजर तरन्नुम शेख यांनीही महिलांना डिजीटल बँकिंगचा महिला दैनंदीन व्यवहारात कसा वापर करु शकतात याबद्दल प्रशिक्षण दिले. या कार्यक्रमास बँकेचे सहप्रबंध संचालक दिलीप देशमुख व कर्मचारी उपस्थित होते. जवळपास 150 पेक्षा अधिक महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.