नवापूर : नवापूर शहरातील गरीब लोकांना कडाक्याचा थंडीत राञी ब्लेकेट वाटप करून माणूसकीचे दर्शन घडवत खर्या अर्थाने त्यांच्या मनात गोडवा निर्माण करून गेला कडाक्याचा थंडीत दिलेल्या ब्लेकेटने उघड्यावर झोपणार्या गरीबांना आनंद मिळाला. नवापूर शहरात गेल्या दोन दिवसापासून कडक्याचे थंडी पडत आहे बाहेर निघणे कठीण झाले आहे असह्य होणार्या कडक्याचे थंडीत बाहेर उघड्यावर झोपणार्याचे काय हाल होत असतील.? हा माणुसकीचा विचार करून नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपशिक्षक हरीश पाटील व बालाजी हार्डवेअर चे संचालक योगेश राजपूत यांनी गरीबांना स्वखर्चातून 100 चादरी, ब्लॅकेटचे वाटप केले. त्यामुळे उघड्यावर कुडकुडत झोपणार्या गरिबांना या उपक्रमातून दिलासा व उष्णतेची उब मिळाली.
गेल्या काही दिवसापासुन उत्तर महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावर, फुटपाथवर, झोपडीत राहणार्या गरीब नागरिकांकडे पुरेसे कपडे नसल्याने त्यांना राञ थंडीत कुडकुडत काढावी लागते हे सर्व हरीश पाटील, योगेश राजपूत यांनी पाहिले त्यांनी आपल्या मिञाचा सहकार्याने बसस्थानक, महात्मा गांधी पुतळा, लाईट बाजार, रेल्वे स्थानक, देवळफळी, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी पुतळा आदि भागात जाऊन राञी ब्लॅकेट व चादरीचे वाटप केले यावेळी आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा युवा नेते शिरिषकुमार नाईक, किरण टिभे , डॉ जयेश अग्रवाल, सुधीर निकम, अजय पाटील, हेमंत जाधव, नईम शेख, आत्माराम ठाकरे, रामु पाटील सहकार्य केले या स्तुत्य व सेवाभावी उपक्रमाचे जिल्हातून अभिनंदन व कौतुक होत आहे