44 प्रवासी असले तर शिंदखेडा आगाराची बस निघेल देवदर्शनाला
शिंदखेडा- शिंदखेडा बस आगारातर्फे भाविकांना सोयीचे व सवलतीत देवदर्शनाला जाता यावे म्हणून 44 प्रवासी जमल्यास महाराष्ट्रात कोठेही बस देवदर्शनाला निघेल अशी माहिती आगार व्यवसथापाक प्रमोद चौधरी व वाहतूक निरीक्षक प्रीती पाटील यांनी दिली
44 प्रवासी जमल्यास शिंदखेडा आगराची बस देवदर्शनाला निघणार असून यात शिंदखेडा-तुळजापूर- अक्कलकोट- पंढरपूर-जेजुरी-शिर्डी येथे फूल तिकीट 1905/- हाफ तिकीट 955/- महिला व जेष्ठ नागरिक सवलत असणार आहे. तसेच
शिंदखेडा-तुळजापूर- अक्कलकोट- पंढरपूर-जेजुरी-शिर्डी-रांजणगाव- देहू- आळंदी- भीमाशंकर- मोरगाव- शिंदखेडा 4 दिवस व 3 मुक्काम साठी फुल तिकीट- 2975/-हाफ तिकीट 1490/- असणार आहे.
तसेच अष्टविनायक, साडेतीन शक्तीपीठ,एक दिवशी यात्रा, सप्तशृंगी गड, महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग, किंवा इतरत्र कुठेही, वन डे पाहिजे असेल तर बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे .यासाठी 44 प्रवासींचा ग्रुप असणे गरजेचे आहे. अधिक माहिती साठी
9021466485, 7498238741 या क्रमांकावर व बस आगारात संपर्क साधण्याचे आवाहन आगार व्यवस्थापकांतर्फे करण्यात आले आहे