प्रॅक्टीस मेक मॅन परफेक्ट या प्रचलित व मराठीत रुळलेल्या उक्तीप्रमाणे सराव करुन सिध्द झालेली तरुणाई युवारंग 2016 च्या महायज्ञात आपल्या कर्तुत्वाची उभारी विविध कलागुणात सिध्द करत, टाळ्यांचा कडकडाट होत आणि उर्जेचा प्रचंड प्रवाह दाखवत फैजपुरच्या धनाजी नाना चौधरी महाविद्यालयाच्या प्रांगणात सज्ज झाली.
आज युवारंगच्या तिसर्या दिवशी तोच उत्साह, उमंग आणि आनंद घेऊन अगदी सकाळी 4 चा गजर लाऊन नीटनेटका पेहराव, स्वच्छतेचा अंगिकार करुन, स्वावलंबनाचा धडा गिरवत सकाळशीच सज्ज झालेली.
सकाळी लवकर उठा असा घरच्यांचा घोषा व्यर्थ ठरवत, वेळेचे भान पाळत 19 ते 23 जानेवारी या पाच दिवसात उर्वरीत आयुष्यासाठी अनुभवाची शिदोरी पदरी जमा करण्यासाठी आतुर झालेली, रंगबेरंगी कपडे, फॅशनच्या सर्व व्याप्त, अव्याप्त संकेतांना सांभाळुन हम भी है जोश मे म्हणत आपआपले महागडे मोबाईल (गॅझेट) फुल्ल चार्ज करुन सेल्फीच्या (मी) मुडमध्ये प्रांगणात स्वच्छ हवा, निसर्ग म्हणजे काय याची अनुभती घेत, सकाळी लवकर उठल्यावर किती ताजेतवाने वाटते याची अनुभूती घेत अरे हे तर छान मजेचे आहे. जागे होणे, नीटनेटके, आवरुन, स्वावलंबनाने सर्व हाताळणे (सदर संदर्भ काळ वेळ नुसार बदलु शकतो)
गुलाबी थंडीत चहाचे घोट रिचवत कांदा पोहे, भजी, कचोरी, समोसाचा आस्वाद घेत जिंदगी जो देती है, उसे लेलो, या अर्विभावात छान वावरत होती. सकाळी रंगमंच 1,2,3,4,5, आणि 6 या मंचावर सहभागी स्पर्धकांनी गर्दी करावयास सुरुवात केली आणि सराव आयुष्यात किती बदल घडवतो याची प्रचिती घेत…. आपआपल्या स्पर्धेच्या अनुशंगाने सरावाला लागला. वादविवाद, मुकनाट्य, शास्त्रीय गायन, सुगम गायन, (पाश्चिमात्य व भारतीय) समुह गीत गायन, फोटोग्राफी, क्ले मॉडेलिंग, व्यंगचित्र, सर्वच स्पर्धा म्हणजे जगण्याच्या अविभाज्य भाग, फक्त याकडे बघण्यासाठी त्या समजुन घेण्यासाठी व यातुन मिळणारा आनंद साठवण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून अथक सराव करत सरसावलेली तरुणाई आणि त्यांना प्रोत्साहन देणारी व उत्साह वाढवणारी, दाद देणारी तरुणाई म्हणजे सकारात्मक उर्जेची प्रचंड लाट, या उर्जेला मंच लाभलाय युवारंग 2016 विद्यार्थी कल्याण विभाग, उमविचा स्तुत्य कार्यक्रम, धनाजी नाना चौधरी महाविद्यालयाचे इतिहास काळात असलेला संदर्भ (काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन झालेले स्थान) आणि नीटनेटके आयोजन, भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था राहण्याची उत्तम सुविधा, या सर्वांमुळे युवारंग उत्तरोत्तर तरुणाईला आकर्षित करतो. काही पात्र आयुष्यात उभारी देण्यासाठी महत्वाची ठरतात.
1. आजुबाजुचे वातावरण
2. सुंदर बघण्याची दृष्टी
3. बदल घडवण्याची जिद्द
4. अथक सराव
5. निसर्ग म्हणजे छडी लागे छमछम
…..जाताजाता सेल्फीचे वेड आणि आत्मतल्लीन तरुणाई समाज स्वास्थासाठी विचार करावयास भाग पाडणारी, सुंदरतेचा सापडलेला मुलामा बदलला पाहिजे (निरागसता आणि आपण सुंदर आहोत याची प्रचिती येणे महत्वाचे) आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांनी आपली ओळख बनली पाहिजे, युवारंगात छान विषय मांडले गेले, अगदी कृषी कुटूंब, निसर्ग, संवाद (हरवलेला), आई-वडिल, गुरुजी यांच्याबद्दल असलेली तळमळ दिसली मात्र ती सादर होण्यापेक्षा आत्मसात झाली तर युवारंग… युवांच्या आयुष्यात रंग भरण्यात यशस्वी झाला असे म्हणता येईल. सलाम तरुणाईला.. युवारंगला.
– प्रा.संदीप केदार
8600070099