भडगाव । मोफत ह्रदयरोग, कॅन्सर व हाडांचे विकार शिबीरात 300 रूग्णांनी शिबीराचा लाभ घेतला. येथील शिवसेना स्वीकृत नगरसेवक सचिन चोरडिया, गणपती हॉस्पीटल व आशिष जैन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 21 जानेवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत काकासट चौक येथे मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करून समाजसेवा करण्यात आली. सकाळी उद्घाटन वेळी डॉक्टर मंडळीसह गणेश सुकसिंग परदेशी, श्रीराम बडगुजर, तालुका प्रमुख दिपक पाटील, शहर प्रमुख शंकर मारवाडी, माजी उपनगराध्य आनंद जैन , विनोद कुमार चोरडिया, प्रमोद जैन, डॉ. रवींद्र पाटील शिवणीकर, डॉ. सुरेश ओस्तवाल, डॉ. मोतीलाल ओस्तवाल, छोटु परदेशी, देविदास पाटील, गणेश पाटील, शाम मुसांडे, दादा महाजन, सिद्धार्थ बंब, आशिष जैन, नितीन शिरसाठ, सुदर्शन मंडळाचे सदस्य आदी उपस्थित होते.
विविध डॉक्टरांकडून रूग्णांची तपासणी
शिबीरात ह्रदयरोग, कॅन्सर व हाडांचे विकार शस्त्रक्रिया, अॅन्जीओप्लास्टी, अॅन्जीओग्राफी, फुफुसरोग, डायलिसिस, अतिदक्षता उपचार, संधीवात, ग्रंथी विकार, संसर्गजन्य रोग, हाडाचे विकार, कॅन्सर प्राथमिक तपासणी इत्यादी आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार करण्यात आले. शिबीरात मोफत इसीजी व औषध वाटप करण्यात आले. शिबीरात रूग्णांना पुढील तपासण्या व शस्त्रक्रिया मोफत करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. शिबीरासाठी डॉ. शितल ओस्तवाल, डॉ. संजोग जैस्वाल, डॉ. गौरव बाफना, डॉ. अर्जुन साठे आदी डॉक्टरांनी उपस्थित राहुन तपासणी केली. शिबिरासाठी सुदर्शन मित्र मंडळ, भंडारी मेडिकल, चेतन मेडिकल, साई मेडिकल, गिता मेडिकल, महावीर मेडिकल शिवसेना तालुका व शहर, आदिनी सहकार्य केले. शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाल्याने पुढे ही अधिक चांगल्या पद्धतीने संकल्पना राबविणार असल्याचे आयोजक नगरसेवक सचिन चोरडिया यांनी सांगितले.