जैन चषक आंतर जिल्हा महिला फुटबॉल स्पर्धेंचा शुभारंभ

0

जळगाव । जिल्हा फुटबॉल असोसिएशन व जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने जैन चषक आंतर जिल्हा फुटबॉल(महिला) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेंचे उद्घाटन दलीचंद ओसवाल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आमदार स्मिता वाघ, चंदुलाल पटेल, सुरेश भोळे, चंद्रकांत सोनवणे, महापौर नितीन लढ्ढा, उपमहापौर ललित कोल्हे, राजेश चौधरी, जफर शेख, नंदलाल गादीया, सुनंदा पाटील, अंजली पाटील, आयशा खान, प्रा. डॉ. अस्मिता पाटील, रागिनी पाटील आदी उपस्थित होते. दरम्यान, क्रिडांगण पुजन महापौर नितीन लढ्ढा यांच्या हस्ते तर पहिल्या स्पर्धेंचे नाणेफेक उपमहापौर ललित कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले.

मिनाक्षी देशमुख ठरली सर्वोत्कृष्ट खेळाडू
रविवारी झालेल्या सामन्यात यवतमाळ विरूद्ध अहमदनगर सामन्यात यवतमाळ संघ विजयी झाला. भंडारा विरूद्ध परभणी यात भंडारा संघ विजयी ठरला तर धुळे विरूद्ध नाशिक सामन्यात नाशिक संघ विजयी झाला. स्पर्धेंतील सर्वोकृष्ट खेळाडू म्हणून मिनाक्षी देशमुख(यवतमाळ), तरन्नुम शेख(परभणी). मेघा पाटील (धुळे) यांना गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी पंच योगेश हिरमोते व गजानन मगुटकर, अशिष लोंढाने व रमीज शेख, बलराम मुरली व अश्रय शहादे, अलोक यादव, सौरभ गोरे, नरेंद्र शिंदे यांनी कामकाज पाहिले. प्रास्तविक फारूख शेख यांनी केले.