मसाकाची ऑनलाईन मॉनिटरींग यंत्रणा कार्यान्वित

0

फैजपूर । जिल्ह्यातील एकमेव मधुकर सहकारी साखर कारखान्याने केेंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सुचनेचे पालन करत प्रदुषणाची टक्केवारी दर्शविणारी ऑनलाईन मॉनिटरींग यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. ती यंत्रणा नवी दिल्ली येथील केंद्रिय प्रदूषण मंडळाशी जोडली गेली असल्याने दर 15 मिनिटाला प्रदुषणाबाबतची माहिती मंडळाला जात आहे. यामुळे वाढत्या प्रदुषणावर आळा बसणार आहे.

जिल्ह्यात सर्वप्रथम मसाकात सुरुवात
प्रदुषण नियंत्रणासाठी ऑनलाईन मॉनिटरींग यंत्रणा बसविणे बंधनकारक केले होते. जिल्ह्यात सर्वप्रथम ही यंत्रणा मधुकर सहकारी साखर कारखान्यामध्ये कार्यान्वित झाली. यावेळी कारखाना ईटीपी ऑनलाईन मॉनिटरींगचे उद्घाटन डिस्टीलरी व उपपदार्थ उपसमितीचे चेअरमन नितीन चौधरी यांच्या हस्ते व डिस्टीलरी ईटीपी ऑनलाईन मॉनिटरींगचे उद्घाटन संचालक अतुल चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे चेअरमन शरद महाजन, व्हा. चेअरमन भागवत पाटील, माजी आमदार अरुण पाटील, नरेंद्र नारखेडे, लिलाधर चौधरी, अनिल महाजन, मिलींद नेहेते, सुरेश पाटील, रमेश महाजन, संजय पाटील, नथू तडवी, भागवत पाचपोळे, दिनकर पाटील, डिगंबर बोरोले, राजेंद्र महाजन, प्रमोद झोपे, संचालिका शालिनी महाजन, निर्मला महाजन, माधुरी झोपे, शैला चौधरी, कारखान्याचे कार्यकारी संचालक महेश सगरे, कुंदन जावळे, के.व्ही. पाटील, प्रमोद फिरके, पी.ओ. सराफ, तेजेंद्र तळेले, कामगार युनियनचे अध्यक्ष गिरीश कोळंबे, सर्व अधिकारी व कामगार वर्ग उपस्थित होते.