45 वर्षीय अनोळखी इसमाचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू

An unidentified man died after falling under the running train भुसावळ : अप रेल्वे लाईनवर कुठल्यातरी धावत्या रेल्वेखाली आल्याने 45 वर्षीय अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. ही घटना 12 नोव्हेंबर रोजी घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

अनोळखीची ओळख पटवण्याचे आवाहन
रेल्वे खांबा किलोमीटर क्रमांक 446/13-15 जवळील अप रेल्वे लाईनवर 45 वर्षीय पुरूष रेल्वेखाली आल्याने मयत झाला. उंची 5.5 फूट, नाक बुटके, रंग गोरा, डोळे मोठे, शरीर बांधा मजबूत, डोक्याचे केस वाढलेले, चेहरा लांबट असे वर्णन आहे तसेच अंगात गोल गळ्याचा फुलबाहीचा टी शर्ट, नीळ रंगाची जीन्स पँट, हातात पिवळा धागा असे वर्णन आहे. मयताची ओळख पटत असल्यास हवालदार आनंदा सरोदे (9823247299) यांच्याशी संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.