45 विद्यार्थ्यांना परिसर मुलाखतीमध्ये मिळाला रोजगार

0

शिरपूर। येथील आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित आय.एम.आर.डी. च्या बी.सी.ए., बी.बी.ए. व बी.बी.एम. या व्यावसायीक अभ्यासक्रमातील 45 विद्यार्थ्यांची हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स, इंदोर या आंतरराष्ट्रीय कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्युमध्ये निवड झाली असून त्यांना 1.26 लाख रुपये प्रती वर्ष या पगारासह निवड झाली असून सर्व विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

सदर कॅम्पस इंटरव्ह्यु हा आर.सी.पटेल इंजीनिअरींग कॉलेज, शिरपूर येथे आयोजीत करण्यात आला होता. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ मधील विविध महाविद्यालयातील 80 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ह्युमन रिसोर्स (एच.आर.), टेलीफोनीक टेस्ट , ऑपरेशन राउंड घेण्यात येऊन यापैकी हिंदुजा ग्लोबल सोल्युशन्स कंपनीने 65 विद्यार्थ्यांची निवड केली व यात 45 विद्यार्थी हे आय.एम.आर.डी., शिरपूर चे आहेत. या सदर शैक्षणिक वर्षात आय.एम.आर.डी.तील बी.सी.ए., बी.बी.ए. व बी.बी.एम. या व्यावसायीक अभ्यासक्रमातील 09 विद्यार्थी टाटा कन्सलटंसी सर्विसेस, पुणे व 11 विद्यार्थी इंफोसिस, पुणे या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्ह्युमध्ये निवड झाली होती.