45 हजाराची दारु नष्ट

0

भुसावळ। सहाय्यक पोलीस अधिक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्थानकाच्या हद्दीत सपोनि कलवानीया, पोनि.बाळासाहेब गायधनी, पोउनि सचिन खामगळ तसेच कर्मचार्यांंनी दारुबंदी कायद्यांतर्गत मांडवेदिगर व भानखेडा शिवारात तापी नदीच्या काठावर कारवाई केली.

यात पोलीसांनी एका अड्ड्यावर दोन पत्री ड्रम, 200 लिटर मापाचे त्यात गावठी हात भट्टीचे गुळ, मोह व नवसागर मिश्रीत 400 लिटर कच्चे रसायन. असा 4 हजार रुपयांचा माल, दुसर्या ठिकाणी 70 लिटर गावठी हात भट्टीचे उकळते कच्चे रसायन व 90 लिटर तयार दारु असा 8 हजार 400 रुपयांचा माल तर तिसर्या अड्ड्यावर 200 लिटर मापाचे 7 पत्री ड्रम त्यात 200 लिटर गुळ, मोह व नवसागर मिश्रीत कच्चे रसायन असा 18 हजार 900 रुपयांचे माल, 35 लिटर मापाचे 9 प्लॅस्टीक कॅन, त्यात 270 लिटर तयार दारु असा एकुण 45 हजार 300 रुपयांचा माल नष्ट केला.