Thieves stole a pair of oxen belonging to a farmer from Dahigaon यावल : तालुक्यातील दहिगाव येथील श्रीराम नगरात असलेल्या खळ्यातून 45 हजार रुपये किंमतीची बैल जोडी चोरट्यांनी लांबवली. यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पशूधन चोरीमुळे खळबळ
दहिगाव, ता.यावल येथील भानुदास देविदास महाजन हे शेकरी असून गावातील श्रीराम नगरात त्यांचे खळे आहे. या खळ्यामध्ये त्यांच्या चुलत भावाची 45 हजार रुपये किंमततीची बैल जोडी बांधली व रात्री बैलजोडीला चारा-पाणी देवून महाजन घरी परतले. बुधवारी सकाळी मात्र बैल जोडी चोरीची बाब उघडकीस आल्याने यावल पोलिसात भानुदास महाजन यांनी धाव घेतली. हवालदार रवींद्र पाटील करीत आहे.