४५० दलितांनी केला हिंदू धर्माचा त्याग

0

अहमदाबाद – गोररक्षकांच्या जाचाला कंटाळून सोमनाथ जिल्ह्यातील ४५० जणांनी धर्मांतर केले. यात २०१६ मध्ये घडलेल्या उना दलित अत्याचार प्रकरणातील पीडितांचा देखील समावेश आहे. मोता समधियाला गावात आयोजित कार्यक्रमात सर्वांनी बौध्द धर्माची दिक्षा घेतली. कार्यक्रमाच्या आयोजकांनी दावा केला आहे की ४५० दलित कुटूंबानी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. या कार्यक्रमात एक हजाराहून आधिक दलित नागरिक सहभागी झाले होते.

उना दलित अत्याचार प्रकरणातील पीडित बालू भाई सर्विया, त्यांची मुले रमेश आणि वश्राम यांच्यासह त्यांची पत्नी कंवर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. बालू भाई यांचा पुतण्या अशोक सर्विया आणि अन्य एका नातेवाईकाने हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. गोररक्षकांनी सात जणांना केलेल्या मारहाणी या दोघांचा समावेश होता.

धर्मांतर केलेल्या रमेश सर्विया याने हिंदू धर्मातील भेदभावाच्या वागणुकीमुळे बौद्ध धर्माचा स्वीकार केल्याचे म्हटले आहे. गोररक्षकांनी आम्हाला मुस्लीम म्हटले होते. हिंदूकडून होणाऱ्या भेदभावाचा आम्हाला त्रास होत होता. आम्हाला मंदिर प्रवेश नाकारला जातो. उना घटनेचा अद्यापही न्याय मिळालेला नाही. यासाठी आम्ही धर्म परिवर्तनाचा निर्णय घेतल्याचे रमेशने म्हटले आहे.