कोल्हापूर । धर्मादाय आयुक्त कार्यालय व सामुदायिक विवाह समिती कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सर्व जाती-धर्माच्या 62 जोडप्यांचा सामुदायिक विवाह आज पेटाळा मैदान येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. वधु-वरांना प्रत्येकी 4500 रुपयांची ठेव पावती देण्यात येणार असून या ठेवीच्या व्याजातून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेचे विमा सुरक्षा कवच वधु-वरांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
दोन योजनांचा लाभ मिळणार
या ठेवीच्या व्याजातून वधु-वरांचे आयुष्यभराची वर्गणी आपोआप बँकेत जमा होईल आणि या दोन योजनांचा लाभ खर्या अर्थाने वधु-वरांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आजच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात एकूण 62 जोडप्यांचे विवाह संपन्न झाले. यामध्ये हिंदू पद्धतीचे 48, बौद्ध 11, मुस्लिम 1, ख्रिचन 1 आणि सत्य शोधक पद्धतीच्या एका विवाहाचा समावेश होता. या सामुदायिक विवाह सोहळ्यातील वधु-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी आमदार अमल महाडिक, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, धर्मादाय सह आयुक्त निवेदिता पवार, सहा. धर्मादाय आयुक्त राहूल चव्हाण, श्री. वाबळे, सामुदायिक विवाह सोहळा समितीचे अध्यक्ष राहुल चिक्कोडे आदी मान्यवर उपस्थित होते. अशा सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे एैपत नसतानाही मुलीचे लग्न कर्ज काढून थाटामाटात करण्याच्या प्रथेला बगल मिळेल. लग्न समारंभासाठी होणारा अवास्तव खर्च वाचेल, यामुळे यापुढील काळात अशा प्रकारचे सामुदायिक विवाह सोहळे व्हावेत यासाठी या समितीच्या वतीने आवश्यक ती मदत केली जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.