खिरवळला 53 वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

0

रावेर । एका 53 वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील खिरवळ येथे घडली. याबाबत रावेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील खिरवळ येथे ज्ञानेश्वर सुखा गाढे (वय 53) यांनी सोमवार 23 रोजी सकाळी 6.30 पुर्वी आपल्या राहत्या घरात छताच्या अँगलला साडीच्या सहाय्याने लटकून गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्ञानेश्‍वर गाढे यांनी केलेल्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत जितेंद्र गाढे यांनी दिलेल्या खबरीवरुन अकस्मात मृत्युची नोंद रावेर पोलिसात करण्यात आली आहे. पोलीसांनी खिरवळ येथे जाऊन घटनेची पाहणी केली. याबाबत पुढील तपास रावेर पोलीस ठाण्याचे फौजदार प्रवीण निकाळजे, हेडकॉन्स्टेबल विनोद साळी, पोलीस कॉन्स्टेबल विकास पहुरकर करीत आहे.