इस्लामाबाद । पनामा पेपर लीक प्रकरणामुळे पाकिस्तानमध्ये सध्या उद्वणार्या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय मुद्रा कोश (आइएमएफ) ने पाकिस्तानला आर्थिक अस्थिरतेला सामोरे जाण्याचा सूचक इशारा दिला आहे. पाकिस्तानमध्ये होणारे बदल जर अयशस्वी ठरणार असतील तर या तीन वर्षांत आर्थिक स्तरावर पाकिस्तान करत असलेली प्रगतीही अयशस्वी ठरेल अशा शब्दांत आइएमएफ ने नवाज शरीफ सरकारला इशारा दिला आहे. आइएमएफचे प्रतिनिधी टोखिर मिर्जोव यांनी पाकिस्तानमधील आर्थिक स्थैर्याला स्थिर करण्याची गरज आहे असे म्हटले आहे. सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तानमधील आर्थिक स्थैर्य कमकुवत होऊ शकते.