जळगाव । विख्यात फोर्ड कपंनीची डिलरशिप असलेल्या सरस्वती फोर्डचा प्रथम वर्धापन दिनी 24 जानेवारीला फोर्डची मस्टँग कार शहरात दाखल होत असल्याची माहिती सरस्वती फोर्डचे संचालक मुकेश टेकवानी व धवल टेकवनी यांनी पत्रकार परीषदेत दिली. फोर्ड एन्डेव्हर या नवीन कारचा डेमो यावेळी देण्यात येणार आहे.
400 पेक्षा अधिक कारची विक्री
जळगावकरांच्या सेवेत दुग्धजन्य पदार्थांच्या क्षेत्रात सरस्वती डेअरी या नावने परिचित असलेल्या सरस्वती गृपने 24 जानेवारी 2016 रोजी सरस्वती फोर्ड नावाने फोर्डची डिलरशिप घेवून व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. गेल्या वर्षभरात 400 पेक्षा अधिक कारची विक्री केल्याचे टेकवानी यांनी सांगितले. तसेच लवकरच बुलढाणा येथे सरस्वती फोर्डची सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
रेफरन्स देणार्या ग्राहकाला गिफ्ट व्हाउचर
फोर्डच्या कारमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले असून बेसीक मॉडल पासून सर्व कारमध्ये एअरबॅग आहेत. आधुनिक नवनवीन फिचर फोर्डद्वारे नेहमीच देण्यात येत असल्याचे टेकवानी यांनी स्पष्ट केले. ग्राहकांने रेफरन्स स्कीमद्वारे ग्राहकाने रेफरन्स दिल्यास त्या ग्राहकाला गिफ्ट व्हाउचर देण्यात येणार आहे. तरी ग्राहकांनी दिलेल्या प्रतिसाद व दाखविलेल्या विश्वासनियतेबद्दल मुकेश टेकवानी व धवल टेकवानी यांनी ग्राहकांचे आभार मानले आहे.