भिवंडीतील रास्त धान्य परवानाधारक दुकानदार संपावर

0

भिवंडी : भिवंडी येथे परवानाधारक धान्य दुकानदार आणि किरकोळ रॉकेल विक्री दुकानदार यांनी त्यांना मिळणार्‍या अल्प नफ्याच्या विरोधात 1 ऑगस्टपासून बेमुदत बंदची हाक दिली आहे. पुरवठा विभागाच्या गोदामात झालेल्या बैठकीत सदर निर्णय जाहीर केल्याची माहिती भिवंडी तालुका संघटनेचे अध्यक्ष शांताराम पाटील यांनी दिली.

संघटनेच्या विद्यमाने दुकानदारांना भेडसावणार्‍या समस्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना देऊन समस्यापूर्तीसाठी सहकार्य करावे अशी विनंती केली आहे. तालुक्यात 156 परवानाधारक धान्य वितरक आणि 450 किरकोळ रॉकेल वितरक आहेत. त्यांच्या रास्त भाव दुकानदार व किरकोळ केरोसिन परवानाधारी संघटना आहेत. सध्या शासनाकडून अल्प नफा मिळतो. त्यामध्ये हमाली, दुकानखर्च, मदतनिस आदिंसाठी अधिक खर्च करावा लागतो. शासनाने तामिळनाडू शासनातर्फे करण्यात आलेल्या अन्न महामंडळ स्थापन करून त्या माध्यमांतून दुकानदारांना मानधन देण्याची योजना आकारावी आणि राज्यातील परवानाधारक दुकानदारांना त्यांत सामावून घेण्याची मागणी केली. शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास बेमुदत संप अटळ आहे असेही संघटनेतर्फे सांगण्यात आले.