भिवंडी : भिवंडी आणि परिसरात राहत असलेल्या लोकवस्तीतून रहिवाशांचे महागडे मोबाइल चोरून त्या मोबाइलचे आयएमईआय नंबर (आंतरराष्ट्रीय ओळख क्रमांक) बदलणारे टोळके भिवंडी गुन्हे शाखेच्या हाती लागलेले आहेत. त्यांची गुन्हे शाखेने चौकशी केली असता ही धक्कादायक माहिती उघडकीस आली.
पोलिसांनी शोएब मोमिन (29), अनस मोमिन (31), दाऊद अंसारी (35), अकबर शेख (32), आरिफ कालीया (26) यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता 25 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शीतल राऊत यांना माहिती मिळाली असता सहकार्यांसमवेत आरोपींच्या घरावर छापे टाकले. या टोळक्याने त्यांच्या अन्य 7 जणांशी संगनमत करून 1 लाख 38 हजार रूपये किंमतीचे भिन्न भिन्न कंपनीचे 62 मोबाइल चोरून त्यांचे आयएमईआय क्रमांक नष्ट करून ते कमी किमतीत विक्री करीत असल्याचे तपासात आढळून आल्याने पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे.