नागरी समस्या सोडविण्यासाठी भाजपचा पुढाकार

0

वासिंद : पावसाळी नागरी समस्या तात्काळ सुटाव्यात यासाठी भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष (ग्रा.) यांनी यासंदर्भात उपक्रमाद्वारे पुढाकार घेतला आहे. खासदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या पुढाकाराने प्रत्येक जिल्हा परिषद गटात कार्यकत्यांची बैठक घेवून केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कामांची व योजनांची माहिती पोहचविण्याबरोबर तिथल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत. सध्यास्थितीत भेडसावणार्‍या खड्डे, वीज, आरोग्य आदी समस्या तात्काळ सुटाव्यात यासाठी सबंधित अधिकार्‍यांना त्वरीत संपर्क साधला जावून त्या समस्या सोडविण्यासाठी सुचना व निर्देश केल्याचे चोरघे यांनी सांगितले. या उपक्रमाची जिल्ह्यातील शहापूर, भिंवडी येथे सुरुवात होत असून यानंतर मुरबाड, कल्याण, बदलापूर या ग्रामीण भागात सुरु राहणार असून यामध्ये जनतेचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.