जळगाव । आंतरजिल्हा बदली पात्र शिक्षकांची यादी जाहीर झाली आहे. या शिक्षकांना उद्या 26 जुलैला जिल्हा परिषदेच्या शाहू सभागृहात पद स्थापना दिली जाणार आहे. शैक्षणिक सत्र सुरू होऊन महिना उलटला तरी आंतर जिल्हा बदलीची मागणी करणार्या शिक्षकांना पद स्थापना देण्यात आल्या नव्हत्या. अन्य जिल्ह्यातून 259 शिक्षक जळगाव जिल्ह्यात आले आहेत. मात्र त्यापैकी अद्याप 152 शिक्षक रुजू झाले आहेत. ऑनलाईन पोर्टलद्वारे शिक्षकांची ही यादी जाहीर करण्यात आली होती. त्यातील शिक्षकांना शिक्षण विभागाने रुजू करून घेतले होते. परंतु, यादीतील शिक्षक हजर झाल्यानंतरच त्यांना पद स्थापना देण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला होता. त्यानुसार ही प्रक्रिया राबवली जाणार आहे. 79 शिक्षक आंतर जिल्हा प्रक्रियेतून मूळ जिल्ह्यात जाणार आहेत. त्या रिक्त जागेवर येणार्या शिक्षकांना पद स्थापना दिली जाणार आहे. यात पेसा अंतर्गत काही जागांचाही समावेश आहे.