46 वर्षीय प्रौढाची घरी कुणीही नसताना आत्महत्या

Suicide of 46-year-old Isma in Faizpur city यावल : फैजपूर शहरातील दक्षिण बाहेर पेठ पोस्ट गल्लीतील रहिवासी असलेल्या 46 वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. हा प्रकार निदर्शनास येताच फैजपूर पोलिसांना माहिती देण्यात आली. रमेश लक्ष्मण वानेरे (46) असे मयताचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
वानेरे हे घरी एकटे असताना त्यांनी आपल्या राहत्या घरात छताला दोरी बांधून गळफास घेतला. पोलिसांना माहिती दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनाकरीता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवण्यात आला. डॉ.सचिन देशमुख यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांना सोपवला. या प्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास पोलिस नाईक विशाल मोहे करीत आहे.