देशाचे ४६ वे सरन्यायाधीश म्हणून रंजन गोगोई यांनी घेतली शपथ

0

नवी दिल्ली-देशाचे ४६ वे सरन्यायाधीश म्हणून रंजन गोगोई यांनी आज बुधवारी शपत घेतली. गोगोई यांचा कार्यकाल नोव्हेंबर २०१९ पर्यंत असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांचा आज कार्यकाळ संपला. त्यांच्या जागी गोगोई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्या.गोगोई यांना शपथ दिली.