शेंदुर्णी । येथून जवळ असलेल्या गोंदेगाव येथे मंगळवार 24 जानेवारी पासून सातदिवशीय येथील गरूड महाविद्यालयाच्या रासेयो विशेष हिवाळी शिबीराचे उद्घाटन सेनेतील जम्मू येथे कार्यरत असलले सैनिक दिपक राजपूत यांच्याहस्ते करण्यात आले. जंगीपुरा ता.जामनेर येथील रहिवासी असून गरुड महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. सदस्य संजय गरुड हे होते. स्वयंसेवकांनी शिबीर काळात मूल्यभान राखत आपापसात चांगल्या गुणांची देवाण-घेवाण करावी, असे गरुड यांनी अध्यक्षीय भाषणातून सांगीतले.
माजी जि.प. सदस्य सागरमल जैन यांनी आपल्या दिल खुलास शैलीत मार्गदर्शन करुन उपस्थित शिबीरार्थी विदयार्थ्यांकडून मनसोक्त दाद मिळवली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव पाटील यांनी महाविदयालयाची भुमिका विषद केली. शेंदुर्णी पत्रकार संघाने झोपडी तांडागाव शासकिय सोयी सुविधा पुरवणेसाठी दत्तक घेतले बाबत पत्रकार संघ अध्यक्ष विलास अहिरे व सहकारी पत्रकारांचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक रा.से.यो कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.डी. गवारे यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रा.दिनेश पाटील यांनी मानले.
उद्घाटनास यांची उपस्थिती
माजी पं.स. सभापती किशोर पाटील, माजी पं.स.सदस्य सुधाकर बारी, भिकन तडवी, ग्रामसेवक श्री. गुरवे, उपसरपंच रामदास चव्हाण, पत्रकार – विलास अहिरे, अॅड.देवेंद्र पारळकर, दिग्वीजय सूर्यवंशी, सुनील शिपी, योगेश सोनार व स्वयंसेवक विदयार्थी तसेच ग्रामस्थ बहूसंखेने उपस्थित होते. दुपारी झालेल्या बौध्दीक सत्रात प्रा. सुनिल गरुड नुतन मराठा महावियालय जळगाव यांनी आजच्या युवकांपुढील समस्या या विषयावर व्याख्यान दिले.