हरताळा शिवारात 3 लाखांचे केमीकल जप्त

0

मुक्ताईनगर । तालुक्यातील हरताळा शिवारातील यादव ढाब्याजवळ पोलीसांनी पडलेल्या मालट्रकमध्ये सुमारे 3 लाख रुपये किमतीचे बनावट केमीकलचे 58 ड्रम आढळुन आले होते. याप्रकरणी पोलिसांनी चौघ जनांविरुद्ध फसवणुक, बनावट कागपत्रे व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ कडुन मुक्ताईनगरकडे येत असलेला ट्रक क्रमांक एमएच 04 डिके 9973 याची हरताळा फाट्यावरील यादव ढाब्याजवळ गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तपासणी केली असता, त्यात काळ्या रंगाच्या टाक्या आढळुन आल्या तसेच ट्रकचालकाजवळ सेंट्रल एक्साईज डिपार्टमेंट, धुळे येथील हीरा पेट्रो केमीकल्स प्रा.ली. पातोंडा, नंदुरबार धुळे येथील कंपनीचे कागदपत्रे मिळाले.

चौघांविरुध्द गुन्हा दाखल
पोलिसांनी मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे तपास केला असता कागदपत्रे बनावट असल्याचे आढळुन आले. आरोपी दिनेश खैरनार रा.पारोळा याने वसीम अहमद इकबाल अहमद, रफिक शेख अहमद (दोघे रा. मालेगांव जि. नाशिक) यांच्या मदतीने केमीकल असलेले 58 ड्रम कोठुनतरी चोरुन वर्धा जिल्यातील व्यक्तीकडे विक्रिसाठी घेवुन जात असतांंना मिळुन आला होता. तपासाअंती पोलिसांना सदरच्या ट्रकमध्ये 58 ड्रम प्रति ड्रम 150 लिटर मापाचे 2 लाख 41 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल व मालट्रक पोलिसांनी हस्तगत केला असुन पोलिस कॉन्स्टेबल संतोष नागरे यांच्या फिर्यादीवरुन वरील चौघांविरुद्ध फसवणुक, बनावट कागदपत्रे व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक अशोक कडलग करीत आहे.