यावल : येथील पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक विलास राणे (वय 36) हे कर्तव्यावर असतांना हृदयविकाराचा झटका येवून त्यांचे निधन झाले. विलास नाईक हे पोलीस ठाण्यात असतांना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला असता भुसावळ येथे रुग्णालयात उपचारासाठी नेत असतांना रस्त्यातच त्यांचे निधन झाले. राणे हे गार्ड ड्युटीवर होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजातच पोलीस कर्मचार्यांमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.