खिर्डी । सांस्कृतिक कार्यक्रमातुन विद्यार्थ्यांना आनंद लुटता येतो. तसेच या कार्यक्रमातूनच विद्यार्थ्यांना आपल्यातील सुप्त कलागुण इतरांना दाखवता येतात त्यामुळे विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रमातुनच आनंद द्विगुणित होवून त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास हातभार लागत असल्याचे प्रतिपादन अ.भा. पाटील विद्यालयाचे सचिव भास्कर पाटील यांनी केले.
यांची होती उपस्थिती
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डिगंबर पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून निभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कदम तसेच संस्था उपाध्यक्ष तुकाराम पाटील, चेअरमन विजय पाटील, मोतीराम पाटील, डॉ. सुधीर पाटील, वसंत पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
200 विद्यार्थ्यांनी नोंदवला सहभाग
यावेळी इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या 200 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यानी देशभक्ति गीत, स्लो डान्स, नृत्य दांडिया सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली. यात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीने आईच्या प्रेमाविषयीचे गीत सादर करुन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
यांनी घेतले परिश्रम
विद्यालयातर्फे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांची विविधांगी विकास होण्याच्या दृष्टीने स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक आर.बी. पाटील, सांस्कृतिक समिती प्रमुख कीर्ति महाजन, जी.पी. देशमुख, वाय.आर. पाटील, एस.झेड. महाजन आदींनी परिश्रम घेतले.