ठाणे : ठाण्यातील वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील बहुतांशी चौक, रस्ते सकाळ-संध्याकाळी वाहतूक कोंडीत गुरफटत आहेत. ठाणेकरांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या या महत्त्वाच्या विषयावर समन्वय प्रतिष्ठानतर्फे परिसंवादाचे आयोजन शनिवार 29 जुलै रोजी सायंकाळी 4 ते 7 वेळेत मराठी ग्रंथ संग्रहालय, जिल्हा परिषद जवळ, सुभाष पथ, ठाणे येथे करण्यात आले आहे. महापालिका अधिकारी, वाहतूक पोलीस उपायुक्त, नगररचनाकार, प्रवासी संघटना प्रतिनिधी, जागरूक नागरिक या परिसंवादात सहभागी होणार आहेत.
याबाबत माहिती देताना आयोजक समन्वय प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे म्हणाले की, शहरातील वाहतूक कोंडीवर केवळ समस्या मांडण्यापेक्षा उपाय देखील सूचवावेत, पालिका, प्रशासन व नागरिकांमध्ये समन्वय साधून, त्यांच्यात चर्चा होऊन शहरातील वाहतूककोंडीवर तोडगा निघावा या हेतूने या परिसंवादाचे आयोजन केले आहे.