शहादा । विना रजिस्ट्रेशन गोट फॉर्म व बोकड पालन प्रशिक्षण आयोजित करुन 47 प्रशिक्षणार्थी लोकांची आर्थिक फसवणूक केल्याबद्दल शहादा पोलिस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहादा येथील रहिवासी भरत पाटील यांच्या तक्रारीवरुन पद्दमाकर एकनाथ मोराडे रा. मोराडे मळा आडगाव लिंक रोड पंचवटी, अजय दामोदर निकम व शशिकांत खंडु पगारे (दोघे रा. सिधार्थ नगर नाशिक) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत पाटील यांच्या तक्रारीवरुन कृषी विकास प्रतिष्ठान किरण मोराडे गोट फॉर्मतर्फे 17 व 18 नोव्हेंबर रोजी बंदिस्त शेळी व बोकड पालन प्रशिक्षण शिबीर शहादा येथील कृषीभवनात आयोजित करण्यात आला होता. प्रशिक्षण दोन दिवस असल्याने पहिल्या दिवसाची 500 रुपये, दुसर्या दिवसाचे 500 रुपये प्रत्येकी व कर्जमंजुरी व सर्टिफिकेटसाठी एकुण 2500 रुपयांची मागणी होती. प्रशिक्षणासाठी एकुण 47 लोक जमलेले होते.
अधिकार्यांची उडवाउडवीची उत्तरे
प्रशिक्षणार्थी मधील भरत पाटील, प्रतिभा अहिरे, विशाल गोसावी, देवेंद्र बाविस्कर, जितेंद्र वळवी (सर्व रा.शहादा) लक्ष्मिकांत माळी कोंडावल, प्रमोद कोळी (रा.पिंप्री) यांनी पावतीवर रजिस्ट्रेशन नंबरची चौकशी केली असता शासन मान्यता प्रमाणपत्र दाखवतो असे सांगुन मोराडे ठिकाणावरुन निघुन गेले. मग स्वतः व प्रशिक्षणार्थी शशिकांत व निकम सर यांना विचारणा केली. नंतर वस्तुस्थिती समजावुन घेण्यासाठी तालुका सह आयुक्त पशु सवर्धन अधिकारी डॉ. काळे यांच्याकडे जावुन विचारपुस केली. स्वतः डॉ. काळे यांनी सर्व पडताळणी केली असता मोराडे हे उडवा उडवीचे उत्तर दिले. शिवाय शिरपुर येथील प्रफ्फुल बारी (रा. शिरपुर) यांचा प्रशिक्षण पुर्ण झाल्याचा सर्टिफिकेटचे अवलोकन केले असता ते देखील शंकास्पद आढळुन आल. त्याचवेळी शशिकांत पगारे व अजय निकम यानी ठिकाणावरुन पळ काढला. त्यामुळे शासनाची मान्यता नसताना व महाराष्ट्राचे रजिस्टेशन नसताना अनाधिकृत पणे प्रशिक्षण चालविणे व प्रचार साहित्य छापुन लोकांची फसवणूक केल्याबद्दल पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास एस.ई.बडगुजर करत आहेत.