मोदींनी मानले जवानांचे आभार; ४७ व्या ‘मन की बात’ला सुरुवात

0

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमाद्वारे देशवासियांना संबोधित करत आहे. दरमहिन्याच्या अखेरच्या रविवारी पंतप्रधान या कार्यक्रमाद्वारे देशातील जनतेला संबोधित करतात. पंतप्रधान मोदींचा हा 47 वा मन की बात कार्यक्रम आहे.

मन की बात कार्यक्रमात बोलताना मोदींनी सर्वप्रथम रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या, त्यानंतर त्यांनी आगाऊ शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. भीषण पूरस्थितीचा सामना करणाऱ्या केरळचाही मोदींनी उल्लेख केला आणि बचावकार्यात मोठे योगदान देणाऱ्या नौदल, एनडीआरएफ आदी सर्व जवानांचे कौतुक केले. संपूर्ण देश केरळसोबत उभा आहे असे ते म्हणाले. मोदींनी ओणम सणाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत.