नवी मुंबई : तुर्भे मधील विविध भागात फेरीवाले आपला व्यवसाय करत असून अश्या फेरीवाल्यांवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई होत आहे. सदरील कारवाई पावसाळ्यात थांबवण्यात यावी यासाठी गुरुवारी तुर्भे विभागातील फेरीवाल्यांनी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत विभाग कार्यालयात घेराव घातला व फेरीवाला धोरण निश्चित होत नाही तोपर्यंत कारवाई करू नका अशी मागणी केली.
फेरीवाल्यांसाठी राष्ट्रीय फेरीवाला धोरण 2014 नुसार उपजीविका संरक्षण व पथ विक्री विनियम 2014 च्या कायद्यानुसार फेरीवाल्यांना परवाना मिळणे बंधनकारक आहे. परंतु आपल्या विभाकडून सतत कारवाई होत असल्याने ती कारवाई त्वरित थांबवण्यात यावीव पथविक्रेता कायद्यानुसार फेरीवाला धोरण नवी मुंबई मनपा प्रशासन ठरवत नाही.तोपर्यंत फेरीवाल्यांवर कारवाई करू नये असे महाराष्ट्र शासनाचे स्पष्ट आदेश आहेत.त्याचे आपण पालन करावे व कारवाई केल्यास कायद्यानुसार नाशवंत भाजीपाल्या सारख्या वस्तू त्वरित दंड घेऊन सोडून देण्यात याव्यात व बिगर नाशवंत माल देखील 24 तासांच्या आत सोडून द्यावा या कायद्याचे पालन आपल्या विभागाकडून व्हावे अशी सूचना यावेळी नवी मुंबई फेरीवाला संघटना कृती समिती कडून तुभेर्र् विभाग अधिकारी यांना करण्यात आली.यावेळी तुर्भे विभागातील फेरीवाले मोठ्या संख्येने उपस्थित होते.